LIVE TV

मंगळवेढा-शहर व ग्रामीण भागात कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत चालली आहे. शनिवारी पुन्हा ४४ करोनाबाधित रुग्णांची वाढ झाली आहे. तर आंधळगाव १ मंगळवेढा येथील १ अशा दोघांचा करोनामुळे मृत्यू झाला आहे.

शनिवार दि.५ सप्टेंबर  रोजी ६९ जणांचे स्वॅब  कोरोना चाचणीसाठी घेण्यात आलेले आहेत. तसेच शनिवारी ५१५ रॅपीड अॅन्टीजन टेस्ट घेण्यात आलेल्या आहेत. ५१५ रॅपीड अॅन्टीजन टेस्ट पैकी ३९ अहवाल पॉझिटिव्ह तर ४७६ जणांचे अहवाल निगेटिव्ह आलेले आहेत.

सदरचे नागरिक हे मंगळवेढा १८, चोखामेळा नगर -४, रड्डे-९  ,खुपसंगी-६ ,लमाणतांडा -१,सलगर बु-१ येथील आहेत. सोलापूर येथे पाठविणेत आलेले स्वॅब चे ५ पॉझिटिव्ह अहवाल प्राप्त झालेले आहेत. सदर नागरिक हे जित्ती ३,मानेवाडी २ येथील पॉझिटिव्ह रुग्णांच्या निकटतम संपर्कातील आहेत.

मंगळवेढा तालुक्यात आतापर्यंत ५८३ रुग्ण पॉझिटिव्ह आढळले आहेत. तर ३३३ रुग्णांना उपचार कालावधी नंतर घरी सोडण्यात आले आहे. आणि आता पर्यंत २३८ रुग्णांवर उपचार सुरू आहेत व आत्तापर्यंत दहा जणांचा मृत्यू झाला आहे.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने

Comments


 

sponsor