LIVE TV

१) मेष रास : मेष राशींच्या जातकांसाठी आजचा दिवस शुभ आहे.शारीरिक व मानसिक स्वास्थ्य चांगले राहील.आज प्रत्येक कार्य उत्साहाने पूर्ण कराल.मित्र व नातेवाईक भेटतील त्यांच्याकडून भेटवस्तू मिळतील.प्रवास होईल.मित्र व परिवार सोबत स्वादिष्ट भोजनाचा आस्वाद घ्याल.आईकडून लाभ होईल.कौटुंबिक वातावरण चांगले राहील.
२) वृषभ रास : वृषभ राशींच्या जातकांसाठी आजचा दिवस साधारण आहे.आज गैरसमज होऊ देऊ नका.मनात क्रोध आणि  निराशेची भावना राहील.रागावर व बोलण्यावर संयम ठेवा नाहीतर उगाचच भांडणे होतील.घराची चिंता असेल त्यामुळे घरासाठी पैसे खर्च होतील.आत्मविश्वास बाळगून राहावे.ईश्वरभक्ती करावी मनाला शांती मिळेल.
३) मिथुन रास : मिथुन राशींच्या जातकांसाठी आजचा दिवस शुभ आहे.नोकरी व व्यवसायात चांगले लाभ होतील.वरिष्ठ अधिकारी तुमच्या कामाचे कौतुक करतील.आर्थिक उत्पन्न वाढेल.स्त्री वर्गाकडून लाभ होईल.मुलांकडून चांगल्या बातम्या येतील. विवाहयोग आहेत.वैवाहिक जीवन सुखी राहील.घरात शांती व सुखाचे वातावरण राहील.
४) कर्क रास : कर्क राशींच्या जातकांसाठी आजचा दिवस शुभ आहे.व्यापारी व नोकरदार यांना चांगला दिवस जाईल.आज प्रत्येक काम व्यवस्थित पूर्ण होईल. नोकरदारांना बढतीचे योग आहेत.सरकारी लाभ होईल.सामाजिक मान-प्रतिष्ठा वाढेल.आर्थिक प्रगती होईल.घरात सजावटीसाठी नवीन वस्तू खरेदी कराल.कौटुंबिक वातावरण चांगले राहील.
५) सिंह रास : सिंह राशींच्या जातकांसाठी आजचा दिवस साधारण आहे.आज स्वभाव तापट,रागीट असल्याने कामात मन लागणार नाही.स्वतःच्या अहंकारामुळे वादविवादात नाराजी ओढवून घ्याल.घाईघाईने कोणतेही निर्णय घेऊ नयेत नाहीतर नुकसान होईल.नोकरी व्यवसायात अडचणी येतील.कामे पूर्ण होणार नाहीत.आज जास्त आरोग्याकडे लक्ष द्यावे.धार्मिक यात्रा होईल त्यामुळे मन प्रसन्न राहील.
६) कन्या रास : कन्या राशींच्या जातकांसाठी आजचा दिवस साधारण आहे.आज कोणतेही नवीन कार्य हाती घेऊ नये.रागावर नियंत्रण ठेवण्यासाठी मौन ठेवणे हेच हिताचे ठरेल.सरकार विरोधी कार्य व अनैतिक कार्य यामुळे संकट ओढवेल त्यामुळे सावध राहावे.बाहेरचे अन्नपदार्थ खाऊ नयेत नाहीतर स्वास्थ्य बिघडेल.आज आग व जलाशय पाणी यापासून सावध राहावे.
७) तूळ रास : तूळ राशींच्या जातकांसाठी आजचा दिवस चांगला आहे.यश व कीर्ती वाढेल.व्यवसायात भागीदारा सोबत लाभ होईल.सामाजिक जीवनात प्रतिष्ठा वाढेल.वाहनसुख मिळेल.वैवाहिक जीवन सुखी राहील.नवीन कपडे व दागिने खरेदी कराल.आरोग्य चांगले राहील.मित्रांसोबत सहलीला जाल.आजचा दिवस मनोरंजन व मौज मस्तीत दिवस घालवाल.
८) वृश्चिक रास : वृश्चिक राशींच्या जातकांसाठी आजचा दिवस चांगला आहे.शारीरिक व मानसिक स्वास्थ्य चांगले राहील.काम करण्यास उत्साह असेल.कामाच्या ठिकाणी सहकाऱ्यांची मदत होईल.अपूर्ण कामे पूर्ण होतील.श्री लक्ष्मीची कृपा राहील.आजचा दिवस कुटुंबासोबात मनोरंजनात व आनंदात घालवाल.
९) धनु रास : धनु राशींच्या जातकांसाठी आजचा दिवस साधारण आहे.आज प्रवास करू नये.कामातील अपयश मनात नैराश्य निर्माण करेल त्यामुळे संताप वाढेल.रागावर नियंत्रण ठेवा त्यामुळे जास्त वादविवाद होणार नाहीत.मुलांची काळजी वाटेल.पोटासबंधी तक्रारी जाणवतील.आरोग्याची काळजी घ्यावी.धनलाभ होऊ शकतो.वैवाहिक जीवन सुखी राहील.
१०) मकर रास : मकर राशींच्या जातकांसाठी आजचा दिवस साधारण आहे.आज शारीरिक व मानसिक उत्साह कमी असेल.आईच्या आरोग्याची काळजी राहील.सामाजिक जीवनात अपयश येऊ शकते व अपमान होणार नाही याची खबरदारी घ्यावी.पुरेशी झोप न मिळाल्याने स्वास्थ्य बिघडेल.स्त्री वर्गाकडून नुकसान होऊ शकते.घरातील वातावरण प्रसन्न ठेवण्याचा प्रयत्न करावा.
११) कुंभ रास : कुंभ राशींच्या जातकांसाठी आजचा दिवस शुभ आहे.आज मन प्रसन्न राहील.शारीरिक व मानसिक स्वास्थ्य चांगले राहील.अपूर्ण कामे पूर्ण होतील.व्यापार व व्यवसाय मध्ये चांगला लाभ होईल.नातेवाईक व भावंडे यांच्याशी बोलून आनंद वाटेल.नातेवाईक घरी येतील.आज स्वादिष्ट भोजनाचा आस्वाद घ्याल.जवळचा प्रवास होईल.कौटुंबिक वातावरण चांगले राहील.आजचा दिवस मनोरंजनात व आनंदात घालवाल.
१२) मीन रास : मीन राशींच्या जातकांसाठी आजचा दिवस साधारण आहे.रागावर बोलण्यावर संयम ठेवा नाहीतर भांडणे होतील.आर्थिक व्यवहार व पैशाची देवाण - घेवाण बाबतीत सावध राहावे.घरात वादविवाद करू नयेत.मनात नकारात्मक विचार येतील त्यामुळे नकारात्मक विचार दूर करून सकारात्मक विचार करावे.बाहेरील अन्नपदार्थ खाऊ नयेत नाहीतर स्वास्थ्य बिघडेल.अनावश्यक खर्चावर नियंत्रण ठेवा.आज ईश्वरभक्ती करावी मनाला शांती लाभेल.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने

Comments


 

sponsor