MPSC परीक्षेचे नवीन वेळापत्रक जाहीर
राज्यात कोरोना व्हायरसच्या संसर्गामुळे महत्त्वाच्या परीक्षा पुढे ढकलण्याचा निर्णय घेण्यात आला होता. राज्यातील वाढत्या कोरोना व्हायरसचा वाढणारा पादुर्भाव आणि कोरोना संसर्गाचा धोका लक्षात घेऊन नवीन तारखा जाहीर करण्यात आल्या आहेत. राज्य लोकसेवा आयोगाची पूर्व परीक्षा ही ११ ऑक्टोबर २०२० रोजी होणार आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांकडे अभ्यास आणि तयारी करण्यासाठी केवळ १ महिन्याचा कालावधी शिल्लक असणार आहे.
राज्य लोकसेवा आयोगाची पूर्व परीक्षा हि २० सप्टेंबर २०२० रोजी होणार होती परंतु कोरोनाच्या पार्श्वभूमीवर परीक्षेच्या नियोजित वेळेत बदल करण्यात आला असून ही परीक्षा ११ ऑक्टोबर २०२० रोजी होणार आहे. महाराष्ट्र दुय्यम सेवा अराजपत्रित गट-ब संयुक्त पूर्व परीक्षा २०२० साठी घेण्यात येणारी परीक्षा २२ नोव्हेंबर २०२० होणार आहे. राज्य लोकसेवा आयोगाचं सुधारित नवीन वेळापत्रक जाहीर करण्यात आले आहे. या वेळापत्रकानुसार ११ ऑक्टोबर २०२०, महाराष्ट्र दुय्यम सेवा अराजपत्रित गट-ब संयुक्त पूर्व परीक्षा २२ नोव्हेंबर २०२० आणि महाराष्ट्र अभियांत्रिकी सेवा पूर्व परीक्षा १ नोव्हेंबर २०२० परीक्षा घेण्यात येणार आहेत.
२६ ऑगस्ट रोजी घेण्यात आली होती तेव्हा MPSC च्या परीक्षेच्या वेळापत्रकात बदल करण्यात आले आहेत. २० सप्टेंबर रोजी घेण्यात येणारी MPSCची पूर्व परीक्षा आता ११ ऑक्टोबर रोजी होणार आहे. तर महाराष्ट्र अभियांत्रिकी सेवा पूर्व परीक्षा २०२० हि १ नोव्हेंबर रोजी नियोजित वेळेत घेण्यात येणार आहे.राज्य लोकसेवा आयोगाचे वेळापत्रक mpsc.gov.in या अधिकृत संकेतस्थळावरही विद्यार्थ्यांना पाहता येणार आहे. दरम्यान राज्य लोकसेवा आयोगाच्या मुख्य परीक्षांचे वेळापत्रक अद्याप जाहीर करण्यात आलेले नाही याची सर्व विद्यार्थ्यांनी नोंद घ्यावी.
सर्व विद्यार्थ्यांनी परीक्षेला जाताना तसेच गेल्यावर सोशल डिस्टन्सिंगचे पालन करणे, हात स्वच्छ धुणे गरजेचे. कोरोना व्हायरसचा प्रादूर्भाव टाळण्यासाठी आयोजनातील कर्मचारी आणि आयोगाकडून शक्य तेवढ्या सर्व उपाययोजना कऱण्यात येणार आहेत. या संदर्भातील संपूर्ण माहिती राज्य लोकसेवा आयोगाच्या संकेतस्थळावरही उपलब्ध असणार आहे.त्यामुळे प्रत्येक विद्यार्थ्यांनी योग्य ती खबरदारी घेऊन परीक्षेला जावे.
टिप्पणी पोस्ट करा