१) मेष रास : मेष राशींच्या जातकांसाठी आजचा दिवस समिश्र आहे.नवीन कार्याची सुरुवात करावी.शारीरिक व मानसिक स्वास्थ्य चांगले राहील.परिवार सोबत कार्यक्रमात सहभागी व्हाल.दुपारनंतर स्वास्थ्य बिघडेल.बाहेरील अन्नपदार्थ खाऊ नये.पैशाची देवाण घेवाण मध्ये सावध राहावे. नकारात्मक विचार मनात आणू नयेत.
२) वृषभ रास : वृषभ राशींच्या जातकांसाठी आजचा दिवस चांगला आहे.कामाच्या ठिकाणी वरिष्ठ अधिकारी यांच्याबरोबर संबंध सुधारतील.घरातील लोकांसोबत घराच्या बाबतीत बोलणे होईल.गृह सजावट कराल.दुपारनंतर सामाजिक कार्यात सहभागी व्हाल.मुलांकडून लाभ होईल.अचानक धनलाभ होईल.कौटुंबिक वातावरण चांगले राहील.
३) मिथुन रास : मिथुन राशींच्या जातकांसाठी आजचा दिवस चांगला आहे.व्यवसायिक व कौटुंबिक क्षेत्रात चांगला लाभ होईल.दोन्ही क्षेत्रात महत्त्वाचे विषय होतील तसेच निर्णय होईल.काम जास्त असल्याने आरोग्य ढासळेल.दुपारनंतर शारीरिक स्वास्थ्य चांगले राहील.मित्र भेटतील त्यांच्यासोबत पर्यटनाला जाल.सामाजिक कार्यात सहभाग घ्याल.कौटुंबिक वातावरण चांगले राहील.
४) कर्क रास : कर्क राशींच्या जातकांसाठी आजचा दिवस समिश्र आहे.नियोजित कार्य पूर्ण कराल.राग वाढेल.आरोग्य बिघडेल.प्रयत्न करून देखील सफल होणार नाहीत.दुपारनंतर शारीरिक व मानसिक स्वास्थ्य चांगले राहील.व्यवसायात महत्वाची चर्चा होईल.घरात काही बदल कराल.कौटुंबिक वातावरण चांगले राहील.
५) सिंह रास : सिंह राशींच्या जातकांसाठी आजचा दिवस साधारण आहे.सकाळी शारीरिक व मानसिक दृष्टीने चिंतीत असाल,व्यस्त असाल.राग वाढल्याने मतभेद होतील.दुपारनंतर नंतर शारीरिक व मानसिक स्वास्थ्य चांगले राहील. व्यापार धंद्यात महत्वाच्या चर्चा होतील.घरात देखील महत्वपूर्ण चर्चा होतील.घरात आनंदाचे वातावरण राहील.
६) कन्या रास : कन्या राशींच्या जातकांसाठी आजचा दिवस साधारण आहे.नवीन कार्याची सुरुवात आज करू नये.तिरस्कार,राग,द्वेष सोडून प्रेम भावनेने काम करावे.रागावर नियंत्रण ठेवा नाहीतर कामात अडचण येईल.व्यवसाय क्षेत्रात देखील संयम राखावा.आरोग्याची काळजी घ्यावी.धार्मिक कार्यात सहभागी व्हाल.आध्यात्मिक क्षेत्रात मन रमेल.
७) तूळ रास : तूळ राशींच्या जातकांसाठी आजचा दिवस चांगला आहे.दिवसाची सुरुवात आनंददायक होईल.आज नवीन कार्याची सुरुवात करू नका.भडक विचार आणि अधिकाराची भावना मनात राहील.आर्थिक लाभ होईल.जवळचा प्रवास होईल.दुपारनंतर बोलण्यावर संयम ठेवावा लागेल.वैवाहिक जीवन सुखी राहील.कौटुंबिक वातावरण चांगले राहील.
८) वृश्चिक रास : वृश्चिक राशींच्या जातकांसाठी आजचा दिवस चांगला आहे.सामाजिक कार्यात सहभागी व्हाल.जवळचा प्रवास होईल.आर्थिक नियोजन आज करावे.दुपारनंतर मित्र व परिवार यांच्यासोबत प्रवास होईल.स्वादिष्ट भोजनाचा आस्वाद घ्याल.अतिउत्साह दाखवू नये.घरात सुख शांतीचे वातावरण राहील.
९) धनु रास : धनु राशींच्या जातकांसाठी आजचा दिवस साधारण आहे.शारीरिक व मानसिक स्वास्थ्य जपावे.जास्त मेहनत केल्यानंतर यश येईल पण निराश होऊ नका.व्यवसाय मध्ये नियोजन कराल.आर्थिक लाभ होईल.आज शक्य असल्यास प्रवास करू नये.दुपारनंतर शारीरिक उत्साह वाढेल.कौटुंबिक वातावरण चांगले राहील.
१०) मकर रास : मकर राशींच्या जातकांसाठी आजचा दिवस साधारण आहे.आज जास्त संवेदनशील राहाल.कोणी तुमच्या भावना दुखावणार नाही याची खबरदारी घ्यावी.गाडी चालवताना काळजी घ्यावी.नकारात्मक विचार मनातून काढून टाकावे.घाईघाईने निर्णय घेऊ नयेत.घरात मतभेद होणार नाहीत याची काळजी घ्यावी.कठोर परिश्रम करावे कामे पूर्ण होतील.सकारात्मक विचार करा.ईश्वर भक्ती करावी मनःशांती लाभेल.
११) कुंभ रास : कुंभ राशींच्या जातकांसाठी आजचा दिवस साधारण आहे.नवीन कार्याची सुरुवात करावी.महत्वाचा निर्णय आज घेऊ नका.दुपारनंतर शारीरिक व मानसिक अस्वस्थता जाणवेल.आईच्या आरोग्याची काळजी घ्यावी.संपत्ती विषयक कागदपत्रे आज करू नयेत.मन शांती साठी ईश्वर भक्ती करावी.कौटुंबिक वातावरण चांगले राहील.
१२) मीन रास : मीन राशींच्या जातकांसाठी आजचा दिवस चांगला आहे. नवीन कार्याची सुरुवात करावी.कार्य करण्यास उत्साह वाढेल.स्वार्थी वृत्तीने काम करू नये.मनात द्विधा स्थिती होऊ देऊ नका.कामाच्या ठिकाणी चांगला दिवस जाईल.बोलण्यावर संयम ठेवला तर वादविवाद होणार नाहीत.कामानिमित्त प्रवास होईल.वैवाहिक जीवन सुखी राहील.कौटुंबिक वातावरण चांगले राहील.
टिप्पणी पोस्ट करा