LIVE TV


१) मेष रास : मेष राशींच्या जातकांसाठी आजचा दिवस चांगला आहे. दिवसाची सुरुवात उत्साहात होईल.नवीन कार्याची सुरुवात करावी.आर्थिक लाभ होतील.प्रवास होईल.नातेवाईक घरी आल्याने आनंदाचे वातावरण राहील. आज स्वादिष्ट भोजनाचा आस्वाद घ्याल.आरोग्य उत्तम राहील.आजचा दिवस आनंदात जाईल.

२) वृषभ रास : वृषभ राशींच्या जातकांसाठी आजचा दिवस साधारण आहे.आज महत्त्वाचे निर्णय घेताना सावधानतेने घ्यावेत.कष्ट करून मोबदला कमी मिळेल तरी नाराज होऊ नका.कोणाबरोबर गैरसमज होऊन देऊ नका.घरात काही कारणांमुळे मतभेद होणार नाहीत याची खबरदारी घ्यावी.खर्च वाढेल.आरोग्याची काळजी घ्यावी.

३) मिथुन रास : मिथुन राशींच्या जातकांसाठी आजचा दिवस चांगला आहे.सामाजिक व आर्थिक तसेच पारिवारिक क्षेत्रात लाभ होईल.सामाजिक प्रतिष्ठा वाढेल.नोकरी व्यवसायात लाभ होईल.मित्र भेटतील व लाभ होईल व त्यांच्यासाठी पैसे खर्च होतील.पर्यटन स्थळी जाल त्यामुळे आनंद वाटेल.विवाह योग आहेत.वैवाहिक जीवन सुखी राहील.कौटुंबिक वातावरण चांगले राहील.दिवसात आनंदात जाईल.

४) कर्क रास : कर्क राशींच्या जातकांसाठी आजचा दिवस चांगला आहे.सरकारी कामे होतील.नोकरी व्यवसायात वरिष्ठ अधिकारी कामाचे कौतुक करतील.पगारवाढ व पदोन्नती होईल.सामाजिक मान प्रतिष्ठा वाढेल.आरोग्य उत्तम राहील.घरात सर्वांबरोबर चांगले बोलणे होईल.कौटुंबिक वातावरण चांगले राहील.

५) सिंह रास : सिंह राशींच्या जातकांसाठी आजचा दिवस साधारण आहे.आज शारीरिक व मानसिक थकवा जाणवेल.काम होण्यासाठी वेळ लागेल.रागावर नियंत्रण ठेवावे.व्यवसायात प्रतिस्पर्धी पासुन सावध राहावे.नोकरीत वरिष्ठांपासून दूर राहावे.पोटाच्या तक्रारी जाणवतील.आरोग्याची काळजी घ्यावी.आज धार्मिक कार्य व प्रवास करावा यामुळे मनाला शांती मिळेल.

६) कन्या रास : कन्या राशींच्या जातकांसाठी आजचा दिवस साधारण आहे.आज नवीन कार्याची सुरुवात करू नका.हितशत्रू विघ्न आणतील त्यामुळे सावध राहावे.आज मनावर संयम ठेवावा.रागावर नियंत्रण ठेवावे.खर्चाचे प्रमाण वाढेल.जलाशय,पाण्यापासून सावध राहावे.आरोग्याची काळजी घ्यावी.

७) तूळ रास : तूळ राशींच्या जातकांसाठी आजचा दिवस चांगला आहे.व्यापार व व्यवसायात चांगला लाभ होईल.नोकरीच्या ठिकाणी सहकारी सहकार्य करतील.कामाचा व्याप जास्त असेल त्यामुळे आराम मिळण्यासाठी मित्र परिवार सोबत फिरायला जाल.सामाजिक मान  सन्मान मिळेल.प्रिय व्यक्तीची भेट होईल आनंद वाटेल.नवीन कपडे व दागिने खरेदी कराल.वैवाहिक जीवन सुखी राहील.आजचा दिवस मनाप्रमाणे घालवाल.

८) वृश्चिक रास :वृश्चिक राशींच्या जातकांसाठी आजचा दिवस  चांगला आहे.नियोजन केलेली कामे पूर्ण होतील.नोकरीत सहकाऱ्यांचे सहकार्य मिळेल.प्रतिस्पर्धी वर विजय मिळवाल.आर्थिक लाभ होईल.महत्वाच्या कामात पैसे खर्च होतील.आजारी व्यक्तिंचे आरोग्य सुधारेल.घरात सुख व शांतीचे वातावरण राहील.

९) धनु रास : धनु राशींच्या जातकांसाठी आजचा दिवस साधारण आहे.कामात अपयश आल्याने निराश राहाल. रागावर नियंत्रण ठेवावे.मुलांचे आरोग्य व अभ्यास यामुळे मनात चिंता निर्माण होतील.कोणासोबत वादविवाद करू नका.साहित्य ,लेखन,व कला याकडे जास्त रुची वाढेल.प्रिय व्यक्तीबरोबर भेट होईल त्यामुळे आनंद वाटेल.

१०) मकर रास : मकर राशींच्या जातकांसाठी आजचा दिवस साधारण आहे.शारीरिक व मानसिक उत्साह कमी असल्याने अस्वस्थ वाटेल.मनात चिंता निर्माण होतील.अनावश्यक खर्च करू नये.स्त्री वर्गाकडून नुकसान होईल.घरात मतभेद करू नका.आरोग्याची काळजी घ्यावी.ईश्वरभक्ती करावी मनःशांती मिळेल.

११) कुंभ रास : कुंभ राशींच्या जातकांसाठी आजचा दिवस शुभ आहे.आज चिंतामुक्त व्हाल त्यामुळे उत्साह वाढेल.व्यवसायात चांगला लाभ होईल.आर्थिक लाभ होईल.सामाजिक मान प्रतिष्ठा मिळेल.वडील व मित्र परिवार यांच्याकडून फायदा होईल.एखादा जवळचा प्रवास होईल.स्वादिष्ट भोजनाचा आस्वाद घ्याल.दाम्पत्य जीवन सुखी राहील.कौटुंबिक वातावरण चांगले राहील.आजचा दिवस मनाप्रमाणे आनंदात घालवाल.

१२) मीन रास : मीन राशींच्या जातकांसाठी आजचा दिवस शुभ आहे.नियोजित कामे पूर्ण होतील.आर्थिक उत्पन्न वाढेल.आर्थिक नियोजन कराल.शारीरिक व मानसिक स्वास्थ्य चांगले राहील.मित्र परिवार सोबत स्वादिष्ट भोजनाचा आस्वाद घ्याल.वैवाहिक जीवन सुखी राहील.आज घरात सुख शांतीचे वातावरण राहील.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने

Comments


 

sponsor