मराठा आरक्षण (Maratha Reservation) प्रकरणात सुप्रीम कोर्टात सुरू असलेल्या सुनावणीदरम्यान कोर्टाने अंतरिम आदेश दिला आहे. त्यानुसार वर्ष २०२०-२१ साठी मराठा आरक्षण स्थगित करण्यात आले आहे.
राज्यातल्या मेडिकल अँडमिशन प्रोसेस आणि नोकरी भरतीत मराठा आरक्षणाचा उपयोग करण्यात येऊ नये असे कोर्टाने म्हटले आहे. प्रकरण ५ न्यायमूर्तींकडे देण्यात आले असले तरी आरक्षणाला नोकर भरती आणि अँडमिशन बाबत मोठा धक्का न्यायालयाच्या निर्णयामुळे बसला आहे. न्यायालयाने तूर्तास केवळ मेडिकल अँडमिशनचा उल्लेख केला आहे.
पदव्युत्तर आरक्षण प्रक्रिया पूर्ण झाली आहे. त्यामुळे यावर निर्णय घेता येणार नाही, पण वैद्यकीय पदवी अभ्यासक्रमामध्ये मराठा आरक्षणाचा लाभ देता येणार नाही, असे देखील सर्वोच्च न्यायालयाने स्पष्ट केले आहे.
मराठा आरक्षणप्रकरणी आता घटनात्मक खंडपीठ सुनावणी पुढची सुनावणी करणार आहे. सुप्रीम कोर्टाचे न्यायमूर्ती एल नागेश्वर राव यांच्या खंडपीठाने मोठा निर्णय घेत आरक्षणाला तात्पुरती स्थगिती दिली आहे. त्यामुळे हे प्रकरण आता ५ न्यायमूर्तींच्या खंडपीठाकडे गेले आहे. त्यामुळे आता पुढची सुनावणी होईपर्यंत राज्य सरकारच्या नोकर भरतीमध्ये मराठा समाजाला आरक्षणाचा लाभ मिळणार नाही. या प्रकरणावर विचार करण्यासाठी मोठ्या खंडपीठाची निर्मिती केली जाईल, असे सरन्यायाधीश एस. ए. बोबडे यांनी म्हटले आहे.
देशातील आतापर्यंत सर्वच राज्यानी ५० टक्या पेक्षा अधिकच आरक्षण दिल आहे, सुप्रीम कोर्टाने आज पर्यंत कुठल्याही आरक्षणाच्या प्रकरणात स्थगिती दिलेली नाही. फक्त महाराष्ट्रासाठी वेगळा निर्णय का घेतला गेला? याच कारण शोधून काढले, अशा प्रतिक्रिया मराठा आंदोलकांकडून येत आहेत.त्यामुळे इतर राज्यांना एक निर्णय आणि महाराष्ट्र राज्याला वेगळा निर्णय का असेही सूर उमटत आहेत.
२०१८ तत्कालीन महाराष्ट्र सरकारने कायदा करून मराठा आरक्षण आणले होते. त्यानुसार शिक्षण संस्था आणि सरकारी नोकरीमध्ये मराठा समाजासाठी १६ टक्के जागा राखीव ठेवण्याची तरतूद करण्यात आली. या नवीन कायद्याला न्यायालयात आव्हान देण्यात आले. मुंबई उच्च न्यायालयाने कायदा घटनेनुसारच असल्याचे सांगत आरक्षण कायम ठेवले पण १६ टक्के ऐवजी कमी कोटा असावा, असे सांगितले होते. मुंबई हायकोर्टाच्या या निर्णयाला सर्वोच्च न्यायालयात विविध संस्थांनी आव्हान दिले होते. घटनेनुसार, ५० टक्क्यांच्या वर आरक्षण देता येत नाही. मग महाराष्ट्र सरकारने ते कसे दिले, असा सवाल करत याला आव्हान देण्यात आले होते.
टिप्पणी पोस्ट करा