आपण संक्रातीला तिळगुळ घ्या गोडगोड बोला असे म्हणतो. तीळ हा बहुगुणी,स्निग्ध आहे. तीळ हे काळे आणि पांढरे अशा दोन प्रकारात मिळतात. आपल्या सर्व भारत देशात तिळाची लागवड मोठ्या प्रमाणात केली जाते. लाल रंगाचे तीळसुद्धा मिळतात त्याला "रामतीळ" असे म्हणतात. पांढऱ्या तिळात तेलाचे प्रमाण जास्त असते.तसेच काळे तीळ औषधी असतात.
तिळामधील असलेले रासायनिक घटक :
प्रोटीन : १६.६ ते २६.४ टक्के,
खनिज द्रव्य : ४.१ ते ७.४ टक्के
कॅल्शियम : १.०६ ते १.४५ टक्के,
आद्रता : ५.१ ते ६.५ टक्के,
स्नेह द्रव्य : ४३.० ते ५६.८ टक्के,
कार्बोहायड्रेट : ९.१ ते २५.२ टक्के,
फॉस्फरस : ०.४७ ते ०.६२ टक्के,
तसेच जीवनसत्व ए, बी, व सी हे विपुल प्रमाणात असते. तिळाच्या तेलात सिसेमीन किंवा सिसेमालिन नावाचे दोन घटक असतात.
तिळाचे औषधी उपयोग :
१) अपचन : ५० ग्रॅम तीळ बारीक कुटून खडीसाखर मिसळून खाल्ल्याने अपचन दूर होते.
२) दात मजबूत आणि कठीण : १ चमचा तीळ रोज रात्री झोपायच्या अगोदर चावून खावेत आणि नंतर कोमट पाणी प्यावे.तुमचे दात मजबूत आणि कठीण होतात.
३) जखम : कोणाला जखम झाली असेल तर तीळ पाण्यामध्ये बारीक वाटून जखमेवर लावल्यास जखम लवकर भरून येते.
४) रक्ती मूळव्याध : तीळ पाणी घेऊन बारीक करावे आणि त्यामध्ये तूप घालून चाटावे त्यामुळे रक्ती मूळव्याध कमी होते.
५) मातेचे दूध : तीळ पाण्यात वाटून ते गरम करून मातेने पिल्यास बाळाच्या आईला जास्त दूध तयार होईल.
६) पोटात वायू(गॅस) : एक चमचा तीळ, थोडी सुंठ, आणि अक्रोड एकत्र घेऊन बारीक करून त्यामध्ये खडीसाखर घालावी आणि पाणी टाकून ते मिश्रण खाल्ल्यास पोटातील वायू(गॅस) कमी होतो.
७) शरीरावरील फोड : १ चमचा बारीक तीळ वाटून गोमूत्रतात शिजवावेत नंतर त्याचे मिश्रण फोडावर बांधल्यास फोड पिकून फुटतो.
८) मासिक पाळी : तीळ पाण्यात शिजवून त्यामध्ये सुंठ, काळेमिरी व पिंपळ चूर्ण घालून ते पाणी पिल्यास मासिक पाळी वेदनारहित होते.
९) गर्भाशय विकार : तिळाचे चूर्ण अर्धा अर्धा ग्रॅम दिवसामध्ये ४ वेळा पाण्याबरोबर पिल्यास गर्भाशयाचा विकार कमी होतो.
१०) बुद्धिवर्धक : २ चमचा तीळ, बदाम ५ ते ६, मनुका २०, सुके खोबरे घेऊन बारीक करून खावे. या सुक्या मेव्याने बुद्धी वाढतेच पण शरीराला ताकद मिळते.
११) अंथरुण ओले : वयोवृद्ध किंवा लहान मुले अनेकदा अंथरुणात लघवी करतात त्यामुळे त्यांना काळे तीळ बारीक करून खायला द्यावे.
१२) वारंवार लघवी होणे : सतत लघवीला होत असेल तर तीळ भाजून गुळात केलेले लाडू सकाळ संध्याकाळ २-२ खावेत. लघवी वारंवार होत नाही.
१३) वजन कमी करणे व वाढवणे : तीळ सडपातळ व्यक्तीला स्थूल आणि स्थूल व्यक्तीला सडपातळ देखील बनवतात.
१४) केस पांढरे : केस पांढरे झाल्यास तिळाचे तेल लावावे. केस काळे होतात.
१५) त्वचा कोरडी : त्वचा कोरडी पडल्यास तिळाच्या तेलाने मालिश करावे त्वचा मऊ होते.
१६) रक्तातील कोलेस्टेरॉल : तिळात मोनोअनसॅच्युरेटेड मेदाम्लं जास्त प्रमाणात असतात त्यामुळे रक्तातील कोलेस्टेरॉल नियंत्रित राहण्यास मदत होते.
१७) सांधेदुखी : सांधेदुखीवर तिळाच्या तेलाने मसाज केल्याने लवकर आराम पडतो.
१८) केसांचे आरोग्य : केस वाढण्यासाठी केसांच्या मुळाशी तिळाचे तेल लावल्याने केस मजबूत राहतात. तसेच केसांत झालेल्या उवा मारण्यासाठी तिळाच्या वनस्पतीचा श्लेष्मल रस जास्त उपयुक्त ठरतो. हा रस लावल्याने केसांत झालेल्या उवा मरतात.
१९) पोटावरील चरबी : पोटावरील अतिरिक्त चरबी झाली असेल ती चरबी कमी करण्यासाठी तिळाच्या तेलाने मसाज करावा. पोटावरील चरबी काही प्रमाणात कमी होते.
२०) मुका मार लागणे किंवा मुरगळणे : मुका मार लागल्यास किंवा एखादा शरीर भाग मुरगळला असेल तर तीळ बारीक कुटून, गरम करून सुती कापडात बांधावेत. आणि मुका मार लागेलेल्या किंवा मुरगळलेल्या भागावर त्याचा शेक द्यावा चांगला आराम पडतो.
टिप्पणी पोस्ट करा