सुशांतसिहं राजपूत मृत्यू प्रकरणात ड्रग्स कनेक्शन प्रकरणी त्याची गर्लफ्रेंड अभिनेत्री रिया चक्रवर्तीला अटक करण्यात आली आहे. NCB च्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार रियाने चौकशीदरम्यान ड्र्ग्स घेतल्याचे कबूल केले आहे. सुशांत आणि त्याच्या मित्रांसोबत अनेकवेळा ड्रग्स घेतल्याचेही रिया चक्रवर्तीने मान्य केले आहे. अटकेनंतर आता रियाची मेडिकल टेस्ट केली जाणार आहे.त्यासाठी तिला सायन रुग्णालयात घेऊन गेले आहेत.
पुरावे मिळाल्यानंतर रियाला अटक करण्यात आली आहे. रियाचे ड्रग्स माफियांसोबत संबंध असल्याचंही उघड झाले आहे. रिया चक्रवर्ती सराईत गुन्हेगार नसल्याने तिला रिमांडची गरज नाही. मात्र वेळोवेळी तिला चौकशीसाठी बोलावले जाणार आहे, असे नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोचे उपसंचालक केपीएस मल्होत्रा यांनी म्हटले आहे.
सुशांतसिंह राजपूत आत्महत्या प्रकरणात अभिनेत्री रिया चक्रवर्ती हिचे नाव पुढे आले होते. त्यानंतर ड्रग्ज प्रकरणात तिचे नाव घेतले गेले होते. रियाचा ड्रग्ज प्रकरणात सहभाग असल्याने एनसीबीने तपासणीसाठी ताब्यात घेतले होेते. रियाला कोणत्याही क्षणी अटक होण्याची शक्यता होती. त्याप्रमाणे एनसीबीने रियाला अटक केली आहे. रियाने एका महत्त्वाच्या गोष्टीची कबुली दिली. आपण BUD ने भरेलली सिगारेट ओढायचो हे तिने कबुल केल्याचे म्हटले जात आहे. याचा अर्थ रिया गांजाची सिगरेट ओढत होती. सुशांतसोबत ही सिगारेट ओढत असल्याची कबुली तिने दिली.
एनसीबी ने रियाच्या घरातून ताब्यात घेण्यात आलेल्या काही उपकरणांमुळे हा खुलासा होऊ शकतो. एनसीबीने रियाच्य घरातून तिचा जुना मोबाईल फोन, लॅपटॉप, टॅब अशा गोष्टी ताब्यात घेतल्या आहेत. ज्यांच्या फॉरेंसिक चाचणीत ही माहिती समोर आली.
रियाला व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे न्यायालयात हजर केले जाईल. एनसीबीने रियाची रविवारी ६ तास आणि सोमवारी ८ तास चौकशी केली. यावेळी एनसीबीने रियाचा धाकटा भाऊ शोविक चक्रवर्ती, सुशांतचा हाऊस मॅनेजर सॅम्युअल मिरांडा आणि सुशांतचा वैयक्तिक कर्मचारी दीपेश सावंत यांची समोरसमोर चौकशी केली.आणि त्या तिघांनाही अटक केली आहे.
नारकोटिक्स ब्युरोच्या पथकाने (एनसीबीने) आतापर्यंत या प्रकरणात ९ जणांना अटक केली आहे. त्यातील ७ जण या तपासाशी थेट संबंधित आहेत तर एनडीपीएस कायद्यातील कलमांतर्गत चौकशी सुरू झाल्यानंतर दोघांना अटक केली गेली. अभिनेता सुशांतसिंग राजपूत १४ जून रोजी वांद्रे येथील अपार्टमेंटमध्ये मृत अवस्थेत आढळला होता.त्यानंतर हि आत्महत्या कि हत्या अशा चर्चा वारंवार होऊ लागल्या होत्या.
ड्रग्स अँगलची चौकशी करणार्या नारकोटिक्स ब्युरोच्या (NCB) पथकाने तिला अटक केली आहे. या चौकशीनंतर बॉलिवूडमधील सुमारे २५ सेलिब्रिटी आता एनसीबीच्या जाळ्यात येण्याची शक्यता आहे. रिया चक्रवर्तीकडे मिळालेल्या इलेक्ट्रॉनिक उपकरणातून ही गोष्ट उघड झाली आहे. काही नावे एनसीबीला शोविक चक्रवर्ती आणि रिया चक्रवर्ती यांनी सांगितली आहेत.लवकरच या सर्वांना एनसीबीमार्फत समन्स पाठविण्यात येणार असून त्यांना चौकशीसाठी बोलावले जाऊ शकते. ही यादी एनसीबीच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना पाठविली आहे. एवढेच नाहीत तर रिया चक्रवर्तीने एनसीबीसमोर म्हटले आहे की, सुशांतच्या चित्रपटांच्या सेटवर देखील ड्रग्ज वापरली जात होती. त्यामुळे आता येणाऱ्या काळात एनसीबी काय कारवाई करते यावर सर्वांचे लक्ष लागले आहे.
रिया चक्रवर्तीच्या चौकशीतून काय आले समोर?
रियाने मान्य केले की, मार्च आणि एप्रिल २०२० मध्ये दिपेशकडून ड्रग्स मागवले होते. त्याचबरोबर या प्रकरणात अटकेत असलेल्या मिरांडा आणि रियाची समोरासमोर चौकशी केली. यावेळीही रियाला तू ड्रग्स घेतले का? असे प्रश्न विचारले होते.
सुशांतसिंग बद्दल मोठा गौप्यस्फोट
रिया चक्रवर्तीने हे ही कबुल केले की, ड्रग्स डिलर बासिद परिहारशी ५ वेळा भेटली होती. त्याची भेट सिनेमाच्या शुटिंगच्या वेळी झाली होती. सुशांत नैराश्यग्रस्त झाला होता. त्याचा अलीकडेच एक सिनेमा रिलीज झाला होता. त्यानंतर सिनेमाच्या शुटिंगच्या दरम्यानच सुशांत ड्रग्स घेत होता, अशी माहितीही रियाने दिली आहे. सुशांत हा ड्रग्सच्या आहारी गेला होता. आम्ही जेव्हा युरोप फिरण्यासाठी गेलो होतो. तेव्हा सुशांतने ही टूर अर्धवट सोडून दिली होती. कारण, या टूरमध्ये सुशांतला कोठेही ड्रग्स मिळत नव्हते, असेही रियाने सांगितले. सुशांतच्या फार्महाऊसवर नेहमी पार्ट्या होत होत्या. यावेळी बरेच जण हे ड्रग्स घेत होते. या पार्ट्यांमध्ये छोट्या कलाकारांपासून ते मोठे कलाकारही या पार्टीत येत होते. सर्वच जण ड्रग्स घेत होते, असे देखील रियाने सांगितले आहे.
NCB ने केलेल्या चौकशीमध्ये रियाने सुशांतच्या कुटुंबाबद्दलही सांगणार आहे. त्यामुळे NCB ने मुंबई पोलीस आणि सीबीआयला विनंती केली आहे की, सुशांतच्या घरातून ताब्यात घेतलेल्या साहित्याची तपासणी करण्यासाठी मागणी केली आहे. यात कुठे CBD ऑइल सारखा पदार्थ कुठे आढळतो का हे NCB ला पाहायचे आहे.
रिया चक्रवर्तीला लवकर मिळणार नाही जामीन
रिया चक्रवर्तीला न्यायालयात हजर केले जाणार असून अंमली पदार्थ प्रतिबंध कायदा 27 (अ) हे अजामीनपात्र कलम लावण्यात आल्याने रियाला NCB कोठडी संपल्यावर लवकरात लवकर जामीन मिळणार नाही, असा हा कायदा सांगतो. त्यामुळे रिया चक्रवतीला पुढील काही दिवस NCB कोठडीत आणि नंतर जेलमध्ये काढावे लागणार हे नक्की.
रिया चक्रवर्तीला किती शिक्षा होऊ शकते?
रिया चक्रवर्ती या प्रकरणात दोषी आढळल्यास तिला एनडीपीसी २० बी कलमांनुसार १० वर्षांपर्यंतची शिक्षा होऊ शकते. तसेच कलम २७ अंतर्गत १ वर्षाच्या शिक्षेची तरतूद आहे. तर कलम २२ अंतर्गत १० वर्षांपर्यंतच्या शिक्षेची तरतूद आहे. एमडीएमए हे असं ड्रग आहे की कुणाकडे हे अर्ध्या ग्रॅमपेक्षा जास्त आढळल्यास त्याच्या अडचणी वाढू शकतात.
टिप्पणी पोस्ट करा