ज्येष्ठमध हे एक आयुर्वेदिक औषध आहे. त्याला यष्टीमधु देखील बोलतात. ज्येष्ठमधाचे झाड ५ ते ६ फुटाचे उंच असते. ज्येष्ठमध चवीला गोड लागते. ज्येष्ठमधामध्ये कॅल्शियम, ग्लिसरायजिक अँसिड , अँटी-ऑक्सिंडंट, अँटी बायोटिक, प्रोटीन आणि असे अनेक खूप गुण आहेत. जे संगीत शिकतात त्यांच्यासाठी ज्येष्ठमध कंठ सुधारक म्हणून उपयोग करते. आयुर्वेदात ज्येष्ठमधाचे महत्त्व सांगितले आहे. चरक संहिता, सुश्रुत, अष्टांग हृदय, सारख्या अतिप्राचीन ग्रंथांमध्ये त्याचा उल्लेख आढळतो. शुध्द हरपणे, पोट दुखी, दमा, स्तनाचे आजार, गुप्त आजार आदी आजारांवर ज्येष्ठमध गुणकारी आहे. ज्येष्ठमधात ग्लिसराइजिक अॅसिडचे प्रमाण असल्याने त्याची चव साखर पेक्षाही जास्त गोड असते. ज्येष्ठमधाच्या वापराने डोळ्यांशी संबंधित विकार, तोंड येणे, घसा खराब असणे, दम लागणे, हृदयरोग, तसेच जुन्या जखम असतील त्यांना ज्येष्ठमधाचा अतिशय चांगला गुण येतो.
१) सर्दी खोकला : ज्येष्ठमध पावडर आणि आवळा पावडर प्रत्येकी २-२ ग्रॅम घेऊन मिसळा या पावडरमध्ये २ चमचे मध घालून हे मिश्रण सकाळी आणि संध्याकाळी खावे. सर्दी आणि खोकल्यावर चांगला लाभ होतो.
२) रक्ताची उल्टी : जर रक्ताची उल्टी झालेल्या व्यक्तीला ज्येष्ठमध दूध किंवा मधासोबत घेतल्याने चांगला आराम पडतो. तसेच उचकी लागत असेल तर ज्येष्ठमध चूर्ण हे अत्यंत गुणकारी आहे.
३) तोंडातील फोड : ज्येष्ठमधाच्या काडीचा छोटा तुकडा तोंडामध्ये काही वेळ चघळत राहा चांगला आराम मिळतो. ज्येष्ठमधाच्या काडीचा छोटा तुकडा घेऊन चघळत राहिल्याने घश्यातील कोरडेपणा आणि मुखदुर्गंधी कमी होते.
४) पोट संबंधित समस्या : १ चमचा ज्येष्ठमध पावडर आणि मध एकत्र मिसळून दिवसातून २ वेळा खाल्ल्यास पोटदुखीवर चांगला आराम मिळतो. ज्येष्ठमध खाल्ल्यामुळे आपली पाचनशक्ती वाढते. ज्येष्ठ मध हे आम्लपित्त वात, कफ, पित्त दोषांना दूर करते.
५) अल्सर : ज्येष्ठमध हे गॅस्ट्रिक अल्सर व लहान आतड्यांना होणार्या ड्यूओडनल अल्सरवर अत्यंत प्रभावी औषध आहे. ज्येष्ठमध हे इतर औषधांच्या खूप परिणामकारक असते आणि अल्सर लवकर बरा होतो.
६) मूत्र विकार : १ कप दुधात १ चमचा ज्येष्ठमध मिसळून प्यावे,त्यामुळे मूत्र किंवा लघवी करताना होणारी जळजळ कमी होते. तसेच ज्येष्ठमधाच्या सेवनाने शरीरातील विषारी पदार्थ बाहेर पडण्यास मदत होते.
७) उच्च कोलेस्टेरॉल आणि हृदयरोग : जगभरातील विविध अभ्यासातून असे निदर्शनास आले आहे की हृदयरोगाच्या उपचारात ज्येष्ठमध महत्वाची आहे. एका अभ्यासपूर्ण संशोधनात उच्च कोलेस्टेरॉल असलेल्या रुग्णांना १ महिण्यासाठी ज्येष्ठमध काढा किंवा अर्क घेतल्यानंतर एकूण खराब कोलेस्टेरॉल(LDL CHOLESTEROL) आणि ट्रायग्लिसराईड( TRIGLYCERIDE) जे मुख्यत्वेकरून हृदयविकारासाठी कारणीभूत ठरते,अशा हानिकारक घटकांच्या पातळीमध्ये मोठ्या प्रमाणावर घट झाली. त्यामुळे ज्येष्ठमधाचे सेवन केल्यामुळे हृदयविकार दूर ठेवण्यास चांगली मदत होते.
टिप्पणी पोस्ट करा