१) २ चमचे तीळ २ तास पाण्यात भिजवा. नंतर तीळ चाळून तीळ पेस्ट बनवा.त्यामध्ये १ चमचा मध घालून दिवसातून दोनदा प्या, यामुळे शरीरात हिमोग्लोबिन लगेच तयार होतो.
२) खजूर आणि दूध एकत्र घ्या आणि रात्री दुधात खजूर खाल्ल्यास शरीरात हिमोग्लोबिनचे प्रमाण वाढेल.
३) पिकलेल्या आंब्याचा गर दुधाबरोबर घेतल्यास शरीरात रक्ताचे प्रमाण वाढते.
४) समप्रमाणात रोज जांभूळ व आवळ्याचा रस घेतल्यास शरीरातील हिमोग्लोबीन लवकर वाढते.
५) रोज शेंगदाणे गुळाबरोबर बरोबर खाल्ल्याने हिमोग्लोबिन त्वरित वाढते.
६) दररोज वाढत्या क्रमाने १,२,३,४,५,६,७,८,९,१०. असे १० दिवस, त्यानंतर पुन्हा उतरत्या क्रमाने, १०,९,८,७,६,५,४,३,२,१, असे रात्री मनुका (किसमिस) एका भांड्यात ठेवा आणि रोज सकाळी दररोज खा.यामुळे हिमोग्लोबिनच्या प्रमाणात लक्षणीय वाढ होते.
७) अर्धा कप द्राक्षाच्या रसात एक चमचा मध घालून दररोज प्या, यामुळे तुमच्या शरीरात हिमोग्लोबिन वाढते.
८) पालक सूप, पालक भाजी खाल्यास शरीरात रक्ताचे प्रमाण जास्त प्रमाणात वाढते.
९) १ कप डाळिंब रस आणि त्यामध्ये गव्हाच्या दाण्याएवढा चुना घेऊन प्या,यामुळे हिमोग्लोबिन त्वरित वाढते.
१०) गाजर आणि बीटचा सम प्रमाणात हिस्सा घेऊन त्याचा रस बनवा. यामुळे शरीरात रक्त त्वरित वाढते.
११) गुंजा नावाचे झाड रक्त वाढविण्यासाठी खूप प्रभावी आहे,गुंजाची ताजी पाने तोंडात चघळून त्याचा रस येईल तो प्या. यामुळे शरीरात हिमोग्लोबिन खूप लवकर वाढतो.
१२) खारीक, अंजिर, मनुका(किसमीस) हे रोज पाण्यामध्ये ठेवा आणि त्यांना सकाळी,दुपारी,संध्याकाळी खा. असे केल्यामुळे शरीरात मोठ्या प्रमाणात रक्त वाढते.
वरील सर्व घरगुती उपचारांमुळे आपल्या शरीरातील हिमोग्लोबिनचे प्रमाण वाढण्यास अधिक मदत होते.
टिप्पणी पोस्ट करा