LIVE TV

एखादी चांगली गोष्टही चुकीच्या वेळी केली ,तर तिचा चांगुलपणा वाया जातो हे तर सत्य आहे आणि पावसाळ्यातील मेकअपला हे लागू आहे. त्यासाठी काही टिप्स :

ताजा मेकअप करून घराबाहेर पडू नये. फेस पावडरचा उपयोग तर स्नानानंतर लगेच करावा.

डोळ्यांचे सौंदर्य खुलविण्यासाठी काजळ- मस्करा वापरात असाल, तर तो पावसात दोन चार थेंबांनी बिघडून जाईल. तेव्हा  वॉटरप्रूफ आयलायनरचा वापर करा वा लाईट बरो पेन्सिलचा.

ब्लशरचा वापर करत असाल तर पावडर ब्लशरऐवजी क्रीमी ब्लशरचा वापर करा.

लिपस्टिक फार गडद करू नये. ओठांवर लिपस्टिकचा एकाच 'कोट' द्यावा. त्याने स्वाभाविक लालिमा दिसेल आणि पाण्यात विरघळणारही नाही.

झोपताना ओठांना हलकीशी कोल्ड क्रीम लावावी. त्याने ओठ मुलायम राहतील. 

स्नानापूर्वी चेहरा, मान, हात यांना दुधाने मालिश करावे. याने त्वचा स्निग्ध राहील. 

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने

Comments


 

sponsor