LIVE TV

इंटरनेट सर्च इंजिन गुगल (Google) ने अँड्रॉइडच्या (Android) युजर्ससाठी नवीन फीचर ‘Verified Calls’ लाँच केले आहे. गुगल कंपनीने हे फीचर ५ देशात लाँच केले आहे, ज्यामध्ये भारताचा देखील समावेश आहे. या  ‘Verified Calls’ फीचरच्या मदतीने युजर्सना स्पॅम कॉलबाबत समजू शकेल. गुगलचे हे फीचर युजरना सांगेल की समोरून तुम्हाला कोण कॉल करत आहे आणि कारण काय आहे, त्याचप्रमाणे कॉलरचा लोगो देखील दाखवण्यात येईल. फ्रॉड कॉलवर रोख आणणे हे या फीचरचे महत्त्वाचे उद्दिष्ट आहे. 

हे फीचर भारत, स्पेन, ब्राझील, मेक्सिको आणि अमेरिका(USA) सह जगभरात रोलआऊट करण्यात येत आहे. याशिवाय बिझनेसचा व्हेरिफाइड बॅच देखील गुगलकडून व्हेरिफाय करण्यात आलेल्या क्रमांकावर दिसणार आहे. गुगलचे नवे फीचर युजर्सना सांगेल की त्यांना करण्यात आलेल्या बिझनेस कॉलचे कारण काय आहे, हे फीचर अद्याप TrueCaller या app मध्ये नाही आहे.

गुगल फोन अ‍ॅपमध्ये हे फीचर आल्याने युजर्सला याचा मोठा फायदा होईल. हे फीचर एकप्रकारे TrueCaller प्रमाणेच काम करते. त्यामुळे हे फीचर मोबाईलमध्ये आल्यावर थर्ड पार्टी अ‍ॅप डाऊनलोड करण्याची गरज नाही. अँड्राईड फोनमध्ये गुगल फोन अ‍ॅप डिफॉल्ट डायलरचे काम करत असते. पुढील अपडेटमध्ये हे नवीन फीचर युजर्सला उपलब्ध होईल.

गुगलने एका ब्लॉग पोस्टमध्ये असे लिहिले आहे की, या पायलट प्रोजेक्टचे सुरुवातीचे रिझल्ट्स परिणाम खूप चांगले आहेत. त्यामुळे युजर्सना याचा फायदा मिळेल. सध्या अशाप्रकारचे फीचर TrueCaller या app मध्ये मिळते आहे, जो युजरना अनोळखी कॉलबाबत माहिती देतो. गुगल Verified Calls आता TrueCaller चे काम करेल. हे फीचर युजर्सची अनेकांना महत्वाचे ठरणार आहे. युजर्सना या फीचरसाठी कोणतोही थर्ड पार्टी app डाऊनलोड करावे लागणार नाही.त्यामुळे कोणी फ्रॉड कॉल केलेला असेल तरीही समजणार आहे.हे फीचर सध्या भारत, स्पेन, ब्राझील, मेक्सिको आणि अमेरिका या ५ देशात चालू करण्यात आले आहे. 

2 टिप्पण्या

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने

Comments


 

sponsor