LIVE TV

डिजिटल दुनियेत सर्वांकडे फोन आहेत. कॅमेराची जागा आता चांगले स्मार्टफोन घेताना दिसत आहेत.लग्नात,किंवा इतर ठिकाणी फिरायला गेले कि काढला फोन काढला सेल्फी असे अनेक फोटो,व्हिडिओ काढण्याची हौस तरुण वर्गापासून मोठ्यापर्यंत घेताना दिसत आहेत. पण अनेकदा आपल्या व्हॉट्स अँपवरून कळत-नकळत फोटो आणि व्हिडीओ डिलीट होतात. त्यामुळे प्रत्येकजण आपल्या फोन मध्ये साठवलेल्य खूप आठवणी, खूप  चांगले वाईट क्षण आपण गमावून बसतो,पण तुम्हाला हे हि माहिती पाहिजे कि डिलीट झालेले फोटो पुन्हा मिळवू शकता ? व्हॉट्स अँपवरून तुमचे फोटो आणि व्हिडीओ डिलीट झाल्यानंतर तुम्ही ते पुन्हा मिळवू शकता. पण तुमच्या फोन मधील सर्व डाटा डिलीट झाल्यानंतर १ महिन्याच्या आतमध्येच डाऊनलोड करू शकता. एक महिन्यानंतर तुमचा डाटा व्हॉट्सॅपच्या सर्वरवरून डिलीट होतात 

कसे मिळवाल तुमचे डिलीट झालेले फोटो

जर  व्हॉट्स अँप यूजरने त्याचे संपूर्ण चॅट डिलीट केलेले नसेल तर फोटो पुन्हा डाऊनलोड करता येतो. त्यासाठी तुम्हाला तुमचे चॅट ओपन करून त्या फोटोपर्यंत स्क्रोल करायचे आहे. त्यानंतर तुम्ही त्या फोटो किंवा व्हिडीओला पुन्हा डाऊनलोड करू शकता. फक्त हे ३० दिवसापर्यंतच डिलीट झालेले फोटो तुम्ही मिळवू शकता, १ महिना होऊन गेला असेल तर ते फोटो डाऊनलोड होणार नाहीत  

तुम्हाला असा येतो एरर 

तुम्हाला व्हॉट्सॅपवर फोटो डाऊनलोड करताना एरर मेसेज दाखवतात. तेव्हा समोर असे लिहिलेले असते की, 'can't download, please ask that it be resend to you?' असा मेसेज आल्यानंतर तुम्ही एकदा तुमचे इंटरनेट कनेक्शन चेक करून पाहा. तसेच तुमच्या फोनमधील तारीख आणि वेळ बरोबर आहे का हे पण पाहा. कारण चुकीची तारीख असल्यावर  व्हॉट्सअँप सर्वर कनेक्ट होताना एरर येतो. तसेच फोनमध्ये स्टोरेज फुल झाल्यानंतरही व्हॉट्सअँप एरर दाखवतात.त्यामुळे हे लक्षात घेणे गरजेचे आहे. 

व्हॉट्सअँपवर नव्या ३ रंगात उपलब्ध होणार थीम

फेसबुकची मालकी असणारे व्हॉट्सअँप सर्वात लोकप्रिय चॅटिंग सोशल मीडिया नेटवर्क आहे. काही दिवसांपूर्वी व्हॉट्सअँपने आपल्या जगातील करोडो युजर्ससाठी 'डार्क थीम' लॉन्च केली होती. आता रंगांच्या आधारावर वेगवेगळ्या थीम तयार करण्याचे काम चालू आहे.
असे अॅक्टिवेट करा डार्क मोड फीचर

व्हॉट्सअँपचे लेटेस्ट व्हर्जन गूगल प्ले स्टोअर वरून डाऊनलोड करा. त्याच्या वरच्या बाजूला टॉपला राइट कॉर्नरवर असलेल्या मेन्यू आयकॉनवर क्लिक करा. त्यानतंर सेटिंगमध्ये जाऊन चॅट हा पर्याय निवडा. त्याठिकाणी तुम्हाला Theme पर्याय दिसेल. त्यामधील डार्क मोड सिलेक्ट करताच तुमच्या व्हॉट्सअँपचा रंग बदलेल.

व्हॉट्सअँप नव्या अपडेट्सवर नजर ठेवणारी वेबसाइट WABetaInfo ने दिलेल्या माहितीनुसार, व्हॉट्सअँप कंपनी ग्रे(राखाडी रंग), येलो(पिवळा) आणि ग्रीन(हिरवा) कलर थीमवर काम करत आहे आणि डार्क थीमसोबतच या ३ थीमही करोडो व्हॉट्सअँप युजर्ससाठी उपलब्ध करून देण्यात येणार असल्याचे सांगितले आहे. 

लोकल ड्राइव्हवर बॅकअप कसा घ्यावा?

१) प्रथम तुम्ही व्हॉट्सअँप खाते उघडा.
२) वरील उजव्या बाजूला कोपऱ्यापर्यंत प्रदान केलेल्या मेनू बटणावर क्लिक करुन सेटिंग्ज वर जा.
३) सेटिंग वर गेल्यावर, चॅट ऑप्शन वर जावा  आणि नंतर चॅट ऑप्शन वरुन चॅट बॅकअप पर्यायावर जावा.
४) तुम्ही आपले बॅकअप खाते सेट केले नसल्यास, अ‍ॅड खाते वर क्लिक करा आणि आपले जीमेल खाते ऍड करा करा.
५) त्यानंतर बॅकअपवर क्लिक करून आपण सध्याचेसर्व संदेश, व्हिडिओ आणि फोटोंचा बॅकअप जतन करून ठेवू शकता. 

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने

Comments


 

sponsor