LIVE TV

जैनवाडी ता.पंढरपूर(प्रतिनिधी-विशाल गोफणे)
काल रात्री अचानकपणे झालेल्या मुसळधार पाऊसामुळे पळशी, सुपली, उपरी, भांडीशेगावं, शेळवे येथील कासळ ओढ्याला आलेल्या पुरामुळे ओढ्याच्या काठच्या असणाऱ्या शेतीपिकाचे प्रचंड मोठे नुकसान झाले. यात विद्युतप्रवाह करणारे खांब ही उन्मळूण पडले आहेत व उपरी गावातील सोलापूर-सातारा रोड वर पाणी आल्यामुळे पुलाची सद्यस्थिती जाणून घेतली  या परिस्थितीची पाहणी करण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष दिपक दादा पवार व पंढरपूर तालुक्याचे कर्तव्यदक्ष पोलीस निरीक्षक भस्मेसो ही उपस्थित होते. झालेल्या नुकसानभरपाई साठी राष्ट्रवादी युवक काँग्रेस प्रशासनाकडे पाठ पुरावा करून नुकसान भरपाई  मिळवून देण्यास कटिबद्ध राहील.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने

Comments


 

sponsor