शेंडगेवाडी ता.पंढरपूर (दि.३१ ) पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी होळकर जयंतीनिमित्त शेंडगेवाडी मध्ये रक्तदान शिबीर; मुख्यमंत्र्यांच्या आव्हानाला प्रतिसाद देऊन 27 रक्तदात्यांनी केले उस्फुर्तपणे रक्तदान केले या कार्यक्रमाचे आयोजन समाधान खांडेकर (एस के पब्लिसिटी पंढरपूर) व शैलेश शेंडगे यांनी केले तसेच जैनवाडी गावातील विशाल कृष्णा गोफणे यांनी 13 रक्तदाते शेंडगेवाडी येथे आणून रक्तदान शिबिरात सहभाग नोंदवला
कोरोना सदृश्य परिस्थितीत रक्ताचा तुटवडा असल्या कारणाने आपण समाजाचे काही देणे लागतो या भूमिकेतून व मुख्यमंत्र्यांनी केलेल्या आवाहनास प्रतिसाद देऊन शेंडगेवाडीतील 28 तरुणांनी रक्तदान केले तसेच डॉ.नवनाथ बापू खांडेकर यांनी रक्तदात्यांना मार्गदर्शन केले व स्वतः रक्तदान केले
रक्तदान संकलनाचे काम पंढरपूर ब्लड बँक पंढरपूर यांनी पार पाडले तसेच भाळवणी प्राथमिक आरोग्य केंद्रचे वैद्यकीय अधिकारी डॉ.अभिजित रेपाळ यांनी शिबिरात भेट देऊन रक्तदात्यांचे अभिनंदन केले
टिप्पणी पोस्ट करा