LIVE TV

धोंडेवाडी. (ता.पंढरपूर )  राजकारणामध्ये जनतेला आश्वासने देऊन निवडून येणे सोपे असते परंतु त्या आश्वासनांना जागणे व जनतेच्या विकासाला प्राधान्य देणे ही गोष्ट सध्याचा राजकारणामध्ये दुर्मिळच म्हणावी लागेल. सोलापूर जिल्ह्याच्या राजकारणामध्ये गेली पंचवीस तीस वर्षांमध्ये जिल्हा परिषदेवर अनेक सदस्य आले आणि गेले पण पंचवीस ते तीस वर्षांमध्ये धोंडेवाडी-वाघाडवस्ती या खडतर रस्त्याचेपण पंचवीस ते तीस वर्षांमध्ये धोंडेवाडी वाघा वस्ती या खडतर रस्त्याचे कुणालाही दयामाया आले नाही आणि नागरिकांची सोय करता आली नाही. परंतु धोंडेवाडी-वाघाडवस्ती नागरिकांचे ते स्वप्न अखेर विद्यमान जिल्हा परिषद सदस्य #शोभाताई_वाघमोडे_देशमुख यांनी पूर्ण केले.
जि.प.सदस्य, सौ. शोभाताई वाघमोडे देशमुख यांनी बारा लाख रुपये खर्च करून रस्त्याचे काम केले पूर्ण....!

जिल्हा परिषद सदस्या सौ.शोभाताई वाघमोडे देशमुख यांनी आपल्या सेस फंडातून अंदाजे बारा लाख रुपये खर्च असणारा १ कि.मी. रस्ता मंजूर करून ,  त्याचे खडीकरण व डांबरीकरण ही पूर्ण करून घेतले आहे. गेल्या पंचवीस ते तीस वर्ष रस्त्याचा  रखडलेला प्रश्न शोभाताई नी मार्गी लावला. त्यामुळे त्यांच्यावर धोंडेवाडी व  वाघाडवाडी च्या ग्रामस्थांमधून कौतुकाचा वर्षाव होत आहे.तसेच टप्प्या-टप्प्याने राहिलेला रस्ताही पूर्ण केला जाईल असेही त्यांनी म्हटले

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने

Comments


 

sponsor