वसंंतराव काळे प्रशाला व कनिष्ठ महाविद्यालय वाडीकुरोली-धोंडेवाडी चे कर्तव्यदक्ष व आदर्श शिक्षक पुरस्कार प्राप्त प्राचार्य मा.श्री. एच्. आर्. जमदाडे सर हे शिक्षण खात्यातील प्रदीर्घ सेवेनंतर सोमवार दिनांक ३१ मे २०२१ रोजी सेवानिवृत्त झाले त्याबद्दल त्यांचा सपत्निक सत्कार व शुभेच्छा समारंभ संपन्न .........
श्रीराम शिक्षण प्रसारक मंडळ वाडीकुरोली संचलीत वसंतदादा काळे शैक्षणिक संकुलातील कर्तव्यदक्ष प्राचार्य मा.श्री. एच् . आर् . जमदाडे सर यांचा सेवानिवृत्त निमित्त संस्थेचे अध्यक्ष मा.श्री. कल्याणरावजी काळे साहेब यांच्या अध्यक्षतेखाली हा कार्यक्रम संपन्न झाला.......
कार्यक्रमाचे अध्यक्ष मा. कल्याणराव काळे साहेब यांनी जुन्या आठवणी जाग्या केल्या,त्याचबरोबर दादांनी जी जबाबदारी जी जमदाडे सरांवर टाकलेली ती प्रामाणिक व अतिशय निष्ठेने ती पूर्ण केली व यापुढे कायम शासकीय सेवेतून निवृत्त झाले असले तरी आपल्या संस्थेसाठी मार्गदर्शन कायम लाभेल असे त्यांनी आपल्या मनोगातून सांगितले व सरांना पुढील आयुष्यासाठी शुभेच्छा दिल्या.
यावेळी उपस्थितीत संस्थेचे अध्यक्ष मा. कल्याणराव काळे साहेब , उपाध्यक्ष मा. बाळासाहेब कौलगे नाना , सचिव मा. बाळासाहेब काळे गुरूजी , संचालक मा. चंद्रकांत पाटील , दिनकर दाजी चव्हाण , रावसाहेब देशमुख , महादेवबापू नाईकनवरे , ग्रामीण साहित्यिक शिवाजीराव बागल सर , विस्तारअधिकारी पंचायत समिती पंढरपूर बिभिषण रणदिवे साहेब , प्राचार्य अनिल कौलगे सर , प्राचार्य शिवाजीराव शेंडगे सर , मुख्याध्यापक दादासाहेब खरात सर , सर्व शाखेतील प्राध्यापक-प्राध्यापिका , शिक्षक-शिक्षिका व शिक्षकेत्तर कर्मचारी यावेळी उपस्थितीत होते.......
टिप्पणी पोस्ट करा