LIVE TV

१) मेष रास : मेष राशींच्या जातकांसाठी आजचा दिवस साधारण आहे.मनाची स्थिती द्विधा असल्याने कोणतेही निर्णय आज घेऊ शकणार नाही.नोकरीत व व्यवसायात आज स्पर्धामय राहील त्यातून बाहेर पडण्याचा प्रयत्न कराल.नवीन कार्य करण्याची प्रेरणा मिळेल.लेखन कार्यासाठी आजचा दिवस उत्तम आहे.घरगुती वातावरण चांगले व प्रसन्न राहील.

२) वृषभ रास : वृषभ राशींच्या जातकांसाठी आजचा दिवस साधारण आहे.नवीन कार्याची सुरुवात आज करू नये.मनाची द्विधा स्थिती असल्याने व्यवहार अडचणीत आणेल.त्यासाठी महत्वाचा वेळ खर्च होईल.स्वभावातील हट्टीपणा सोडून द्यावा.कोणासोबत वादविवाद घालू नयेत.शक्य असल्यास आज प्रवास करू नये.कलाकारांना आजचा दिवस चांगला आहे.आरोग्याची काळजी घ्यावी.

३) मिथुन रास : मिथुन राशींच्या जातकांसाठी आजचा दिवस चांगला आहे.दिवसाची सुरुवात प्रसन्न होईल.नोकरी,व्यवसायात चांगली प्रगती होईल.आर्थिक लाभ होईल.आज कोणतेही नकारात्मक विचार मनात आणू नयेत.सकारात्मक विचार करावेत.आज मित्र व परिवार यांच्यासोबत फिरायला जाल व स्वादिष्ट भोजनाचा आस्वाद घ्याल.आरोग्य चांगले राहील.कौटुंबिक वातावरण चांगले राहील.

४) कर्क रास : कर्क राशींच्या जातकांसाठी आजचा दिवस साधारण आहे.आज शारीरिक व मानसिक अस्वस्थता राहील.मनाची द्विधा स्थिती राहील.बोलण्यावर व रागावर संयम ठेवा.कोणासोबत भांडणे व वादविवाद करू नयेत.गैरसमज असल्यास दूर करावेत.आरोग्याची जास्त काळजी घ्यावी.घरातील सर्वांशी प्रेमाने वागावे.

५) सिंह रास : सिंह राशींच्या जातकांसाठी आजचा दिवस साधारण आहे.आज आत्मविश्वास नसल्याने मनाची स्थिती द्विधा असल्याने आलेल्या संधीचा फायदा उठवता येणार नाही.व्यापारात चांगला फायदा होईल.आज कोणतेही महत्त्वाचे निर्णय घेऊ नयेत.जास्त विचारात अडकून राहू नये.मित्र व स्त्री वर्गाकडून लाभ होईल.मुलांबरोबर चर्चा होईल.मित्र व परिवार सोबत स्वादिष्ट भोजनाचा आस्वाद घ्याल.

६) कन्या रास : कन्या राशींच्या जातकांसाठी आजचा दिवस शुभ आहे.नवीन कार्याची योजना बनवाल.व्यापारी व नोकरदारांना आजचा दिवस लाभ देणारा आहे.व्यापारात लाभ होईल.वरीष्ठ अधिकाऱ्यांची कृपादृष्टी राहील.बढतीचे योग आहेत.वडिलांकडून लाभ होईल.आरोग्य उत्तम राहील.घरात प्रसन्न आणि आनंदाचे वातावरण राहील.

७) तूळ रास : तूळ राशींच्या जातकांसाठी आजचा दिवस साधारण आहे.नोकरीत वरिष्ठांची नाराजी राहील.लेखन व साहित्य निर्मिती मध्ये वेळ घालवावा.नकारात्मक विचार करू नयेत.बोलण्यावर संयम ठेवा.कोणासोबत वादविवाद घालू नयेत.मुलांची काळजी राहील.दूरच्या प्रवासाचे नियोजन कराल.आरोग्याची काळजी घ्यावी.ईश्वरभक्ती करावी मनःशांती लाभेल.

८) वृश्चिक रास : वृश्चिक राशींच्या जातकांसाठी आजचा दिवस साधारण आहे.नवीन संबंध विचारपूर्वक बनवा.रागावर नियंत्रण ठेवावे.कोणतीही अनैतिक कामे करु नयेत.पैसे जास्त खर्च होतील त्यामुळे आर्थिक चणचण भासेल.काम वेळेवर पूर्ण न झाल्याने निराश होऊ नका.बाहेरील अन्नपदार्थ खाऊ नयेत.आरोग्याची काळजी घ्यावी.आध्यात्मिक व योग यातून  मनःशांती मिळेल.

९) धनु रास : धनु राशींच्या जातकांसाठी आजचा दिवस चांगला आहे.बौद्धिक व तार्किक विचार विनिमय करण्यासाठी चांगला दिवस आहे.सामाजिक मान-सन्मान मिळेल.भागीदारी मध्ये चांगला लाभ होईल.नोकरदारांना चांगला दिवस जाईल.मित्र भेटतील फिरायला जाल.नवीन कपडे खरेदी कराल.मित्र व परिवार सोबत स्वादिष्ट भोजनाचा आस्वाद घ्याल.शारीरिक स्वास्थ्य चांगले राहील.घरात प्रसन्न आणि आनंदाचे वातावरण राहील.

१०) मकर रास : मकर राशींच्या जातकांसाठी आजचा दिवस शुभ आहे.आज हाती घेतलेल्या कार्यात यश मिळेल.व्यापारात व धंद्यात मोठे यश मिळेल पण कायद्याच्या कचाट्यात सापडू नका याची खबरदारी घ्यावी.व्यापार व उद्योग मध्ये नवीन योजना बनवाल.आर्थिक उलाढाल व्यवस्थित होईल.आर्थिक लाभ होईल.विदेशात व्यवसाय आहे त्यांना चांगला फायदा होईल.आरोग्य उत्तम राहील.घरात प्रसन्न आणि आनंदाचे वातावरण राहील.

११) कुंभ रास : कुंभ राशींच्या जातकांसाठी आजचा दिवस साधारण आहे.आज नवीन कार्याची सुरुवात करू नये.बौद्धिक व लेखन कार्य मध्ये लक्ष द्याल.विचारात सतत बदल होतील.सकारात्मक विचार ठेवावेत.स्त्री वर्गाने बोलण्यावर संयम ठेवावा नाहीतर भांडणे वादविवाद होतील.शक्य असल्यास प्रवास करू नये.मुलांच्या प्रश्न निर्माण होतील.आरोग्याची काळजी घ्यावी.ईश्वरभक्ती करावी मनःशांती लाभेल.

१२) मीन रास : मीन राशींच्या जातकांसाठी आजचा दिवस साधारण आहे.आज जास्त हळवे बनू नका. आज उत्साह व स्फूर्ती कमी राहील.घर,मालमत्ता संबंधित कागदपत्रे सांभाळून ठेवा.स्त्री वर्गाशी व्यवहार करताना सावध राहावे.आज प्रवास करू नये.पाण्यापासून सावध राहावे.आईच्या आरोग्याची व तुमच्या आरोग्याची काळजी घ्यावी.घरातील वातावरण चांगले ठेवण्यासाठी वादविवाद करू नयेत.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने

Comments


 

sponsor