LIVE TV

हजारांहून अधिक रूग्णांना दिला प्लाझ्मा मिळवुन: प्लाझ्मा मिळवून देणाऱ्या  युवकाला थेट कुवेत (सौदी)मधुन सन्मानित  

रणसिंगवाडी  ता.खटाव येथील आप्पासाहेब घोरपडे यांना  रूग्णसेवेसाठी लाईफ सेव्हर ग्लोबल पुरस्काराने  सन्मानित करण्यात आले आहे .

कोरोनाच्या  संकटकाळी अनेकांना रूग्णांना आर्थिक दृष्ट्या  लुटण्याच्या  प्रयत्न केलेले प्रकार समोर येत असताना रूग्णसेवेला महत्व देणारे आणि गेल्या दोन वर्षांपासून कोरोना योद्धा म्हणुन कार्य करणारे आप्पासाहेब घोरपडे रक्तदान आणि प्लाझ्मा दान मध्ये महत्वाची भूमिका बजावत आहेत.    

प्लाझ्मा  दान करण्यासाठी जनजागृती करण्याबरोबर  आजपर्यंत  एक हजार पेक्षा जास्त रूग्णांना प्लाझ्मा मिळवुन दिला आहे .कुवेतमधील ( सौदी) येथील रूग्ण पुण्यामध्ये दाखल असताना त्यांना प्लाझ्मा मिळवुन दिला आहे तसेच रक्तदान शिबिरात प्रत्येक रक्तदात्याला एक लाखांचा विमा देणारे आप्पासाहेब हे जिल्ह्यातील पहीले व्यक्ती आहेत .

   

आप्पासाहेब घोरपडे यांच्या  कार्याची दखल घेत लाईफ सेव्हर ग्लोबल कुवेत संस्थेने सन्मानित केले आहे . हर्ष  फाॅऊडेशनचे स्वंस्थापक आणि श्री शिवशंभु चॅरिटेबल ट्रस्टचे महाराष्ट्र संपर्क प्रमुख आहेत .श्रीमंत घोरपडे प्रतिष्ठान आणि मराठा शिवमुद्रा ग्रुपचे सभासद आहेत तसेच शिवसेना वैद्यकीय मदत कक्षाचे पुणे  उप शहर प्रमुख म्हणुन कार्यरत आहेत

अश्याच प्रकारच्या बातम्या पाहण्यासाठी फाँलो करा .

1 टिप्पण्या

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने

Comments


 

sponsor