LIVE TV

पंढरपूर (सोलापूर) : पंढरपूर (Pandharpur) जिल्हा करण्याचा ठराव गुरुवारी सोलापूर जिल्हा परिषदेच्या (Solapur ZP) सर्वसाधारण सभेत सर्वानुमते मंजूर करण्यात आल्याने अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेली मागणी या निमित्ताने पुन्हा पुढे आली आहे. पंढरपूर, सांगोला (Sangola), मंगळवेढा (Mangalwedha), माळशिरस (Malshiras), करमाळा (Karamala), माढा (Madha) या तालुक्‍यांच्या बरोबरच सांगली (Sangli) जिल्ह्यातील आटपाडी (Atpadi) तालुक्‍याचा पंढरपूर जिल्ह्यात समावेश करता येणे शक्‍य आहे. तसे झाल्यास या तालुक्‍यांमधील हजारो नागरिकांची मोठी सोय होईल. मात्र, पंढरपूर जिल्हा निर्मितीसाठी राजकीय इच्छाशक्तीची गरज आहे. संबंधित आमदारांनी त्यासाठी शासनाकडे ठोस पाठपुरावा करून अनेक वर्षांपासूनचे पंढरपूर जिल्हा निर्मितीचे स्वप्न सत्यात आणले पाहिजे. 



सोलापूर जिल्हा परिषदेतील सांगोला तालुक्‍यातील कोळा जिल्हा परिषद मतदार संघाचे सदस्य सचिन देशमुख यांनी जिल्हा परिषदेच्या सभेत पंढरपूर जिल्हा करण्याचा ठराव मांडला. पंढरपूर तालुक्‍यातील कासेगावचे जिल्हा परिषद सदस्य व पांडुरंग कारखान्याचे उपाध्यक्ष वसंतराव देशमुख यांनी त्या ठरावास अनुमोदन दिले. विशेष म्हणजे सर्वानुमते हा ठराव मंजूर झाला. आता जिल्हा परिषदेत सर्वानुमते मंजूर झालेला हा ठराव शासनाकडे पाठवण्यात आल्यावर आमदार बबनराव शिंदे, आमदार प्रशांत परिचारक, आमदार रणजितसिंह मोहिते-पाटील, आमदार शहाजी पाटील, आमदार राम सातपुते, आमदार संजय शिंदे आदींनी शासनदरबारी या कामी ठोस पाठपुरावा केला पाहिजे.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने

Comments


 

sponsor