LIVE TV

यंदाच्या वर्षातील सर्वात मोठा मोबाईल शो बार्सिलोना येथे होणार आहे. या शो मध्ये अनेक कंपन्या आपले नवीन स्मार्टफोन्स लाँच करणार आहेत. या शो मध्ये Realme कंपनी जगातील पहिला 240 वॅट चार्जिंग असलेला स्मार्टफोन Realme GT 3 लाँच करणार आहे. हा स्मार्टफोन 28 फेब्रुवारीला लाँच केला जाणार आहे. या फोनला 16 GB रॅम व 256 GB Internal स्टोरेज असणार आहे.
हा फोन 6.74 इंच AMOLED डिस्प्लेसह असेल. या फोनच्या स्क्रीनचा रिफ्रेश रेट हा 144Hz इतका आहे. या फोनला 50 मेगापिक्सलचा प्रायमरी लेन्स कॅमेरा, 8 मेगापिक्सलची अल्ट्रा वाईड लेन्स आणि 2 मेगापिक्सलचा असे तीन कॅमेरा असतील. तसेच सेल्फी कॅमेरा हा 16 मेगापिक्सलचा असणार आहे. हा स्मार्टफोन Realme GT Neo 3 चा ग्लोबल व्हर्जन आहे. या स्मार्टफोनमध्ये खास फिचर म्हणजे या फोनला 240 वॅटचे SuperVOOC फास्ट चार्जिंग सपोर्ट करतो. या फोनमध्ये 4600 mAh ची बॅटरी देण्यात आली आहे. मुख्य म्हणजे हा फोन 10 मिनिटांमध्ये 100 टक्के चार्ज होतो.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने

Comments


 

sponsor