पोस्ट ऑफिस ग्राहकांसाठी कायमच नवनवीन योजना आणत असते. अशातच आता अजून एक योजना आणली आहे. या योजनेमध्ये तुम्ही गुंतवणूक केली तर डबल पैसे मिळणार आहेत. किसान विकास पत्र योजना असे या योजनेचे नाव असून या योजनेतील व्याजदरातही वाढ करण्यात आली आहे. या योजनेत तुम्ही केवळ 120 महिन्यांत तुमचे पैसे दुप्पट करु शकता. यामध्ये तुम्हाला 7.20 टक्क्यांपर्यंत व्याज मिळेल. या योजनेत तुम्ही किमान 1000 रुपये गुंतवू शकता.
जर तुम्ही 5 लाख रुपये गुंतवले असतील तर तुम्हाला 7.2 टक्के व्याज मिळेल आणि 120 महिन्यांत तुमचे पैसेही 10 लाख रुपये अर्थात ते दुप्पट होतील. या योजनेसाठी तुम्हाला पोस्ट ऑफिसमध्ये जाऊन अर्ज भरावा लागेल आणि गुंतवणूक रोख, चेक किंवा डिमांड ड्राफ्टद्वारे जमा करावी लागेल. तुम्हाला तुमचे ओळखपत्र देखील द्यावे लागेल आणि अर्ज केल्यानंतर लगेच तुम्हाला किसान विकास पत्र प्रमाणपत्र मिळेल. यामुळे तुम्हाला याचा चांगला फायदा मिळेल.
😍👍🏻
उत्तर द्याहटवाटिप्पणी पोस्ट करा