LIVE TV

भाळवणी ता.पंढरपूर : पंढरपूर तालुक्यातील आरोग्यवर्धिनी केंद्र भाळवणी येथे आशा स्वयंसेविका यांना थर्मल स्कॅनर ऑक्सामीटर व मास्क चे वाटप जिल्हा परिषद सदस्य मा.शोभाताई वाघमोडे-देशमुख  व श्री.तानाजी वाघमोडे-देशमुख  यांच्या हस्ते वाटप करण्यात आले        
    कोरोना रोगाच्या पार्श्वभूमीवर संसर्ग टाळण्यासाठी 39 थर्मल स्कॅनर, 39ऑक्सामीटर त्यासोबत प्रत्येकी 2 सेल व प्रत्येकी 5 मास्कचे वाटप करण्यात आले जेणेकरून रुग्णांना लवकरात लवकर आपला दिसून येणारी लक्षणे  लक्षात यावीत यासाठी  व त्यांच्या रक्तातील ऑक्सिजनचे प्रमाण किती आहे हे पाहण्यासाठी ऑक्सामीटर व आशा स्वयंसेविका यांना त्यांच्या संरक्षणासाठी ट्रिपल लेअर चे मास्क वाटप करण्यात आले असून यामुळे घरोघरी जाऊन प्रत्येक नागरिकांची थर्मल स्कॅनिंग  व ऑक्सामीटर यामुळे रक्तातील ऑक्सिजनचे प्रमाण कळण्यास लवकरात लवकर मदत होणार आहे   
      यावेळी प्राथमिक आरोग्य केंद्रातील सर्व स्टाफ हजर होता व प्राथमिक आरोग्य केंद्र भाळवणी चे वैद्यकीय अधिकारी डॉ.अभिजीत रेपाळ यांनी सर्व या साहित्याच्या वापराविषयी आशा स्वयंसेवक यांना मार्गदर्शन केले

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने

Comments


 

sponsor