जवळपास मागील दीड वर्षापासून श्री शिवशंभू चॅरिटेबल ट्रस्ट कमिटी महाराष्ट्र राज्याच्या वतीने महाराष्ट्र मध्ये रक्तदान शिबिराचे आयोजन करून तेथील लोकांना रक्ताची मोफत उपलब्ध करून देण्याची ट्रस्टची संकल्पना ही 100% यशस्वी होताना दिसत आहे, आजपर्यंत बऱ्याच ब्लड बँकेनी महाराष्ट्र मध्ये रक्तदान शिबिर घेतल्यानंतर रक्ताची मोफत बॅग न उपलब्ध करून देण्यामुळे रक्तदान हा बॅड बँकेचा धंदा समजून लोकांचा रक्तदाना वरचा विश्वास हा पूर्णपणे नाहीसा झाल्यानंतरही ही श्री शिवशंभु ट्रस्ट ने हा विश्वास 2 वर्षांमध्ये पुन्हा मिळवला आहे.
श्री शिवशंभू चारीटेबल ट्रस्ट वरती बऱ्याच लोकांनी यापूर्वी आरोप-प्रत्यारोप करण्यास मागेपुढे पाहिले नाही परंतु नागरिकांनी आणि रक्तदात्यांनी शिवशंभू चारीटेबल ट्रस्ट वरती विश्वास ठेवून प्रत्येक वेळेस शिवशंभु ट्रस्टच्या माध्यमातून ज्या ठिकाणी रक्तदान शिबिराचे आयोजन केले आहे त्याठिकाणी जाऊन रक्तदानाला उत्कृष्टपणे प्रतिसाद दिल्या मुळे हे सर्व शक्य झाले आहे असे श्री शिवशंभू चारीटेबल ट्रस्ट कमिटी महाराष्ट्र राज्याच्या वतीने सांगण्यात आले. महाराष्ट्र मध्ये इंदापूर, पुणे, बारामती, बीड दौंड,बार्शी,सोलापूर,कुर्डूवाडी,करमाळा, अकलूज, पंढरपूर या अनेक शहरांमध्ये श्री शिवशंभू चारीटेबल ट्रस्ट माध्यमातून गोर गरीब आणि गरजू रुग्णांना मोफत रक्तची बॅग उपलब्ध करून दिली जात आहे
यापुढेही महाराष्ट्रामध्ये कोणत्याही ब्लड बँकेला शिवशंभू चॅरिटेबल ट्रस्टच्या माध्यमातून रक्तदान शिबिराचे आयोजन करायचे असल्यास शिवशंभु ट्रस्टला रक्तदान शिबिराच्या 25% रक्ताचा कोटा लिहून घेतल्यानंतरच रक्तदान शिबिर घेतले जाणार आहे आणि त्यातून गोरगरीब रुग्णांना मोफत बॅग भेटणार आहे शिवशंभु ट्रस्टच्या माध्यमातून विश्वासाने सांगण्यात येत आहे की गोरगरीब रुग्णांना आजपर्यंत जवळपास 450 च्या वरती मोफत रक्ताची बॅग देण्यात आल्या आहेत, आहेत त्यामुळे हा आपला सर्वांचा विश्वास शिवशंभू ट्रस्ट वरतीअसाच कायम राहावा अशी ट्रस्टच्या माध्यमातून आपणास विनंती.
तसेच कोरोणाच्या पार्श्वभूमीवर इंदापूर तालुक्याच्या रक्तदानाचा रेकॉर्डब्रेक कार्यामध्ये भगवानराव भरणे प्रतिष्ठान, प्रवीण भैय्या माने युवा मंच, भारतीय जैन संघटना, लोकसेवक गणपतराव आवटे फाउंडेशन, ह्यूमन राइट्स फाउंडेशन, योद्धा प्रोडक्शन यांचेही मोलाचे सहकार्य लाभले
टिप्पणी पोस्ट करा