LIVE TV

(प्रतिनिधी-विशाल गोफणे)ता. करमाळा: कोरोणा वायरसच्या प्रादुर्भावामुळे रक्ताच्या तुटवड्यावर मात करण्यासाठी उमरड येथे शनिवार दिनांक 04/07/2020 रोजी रक्तदान शिबिराचे आयोजन केले होते. या रक्तदान शिबिरामध्ये 103 रक्तदात्यांनी रक्तदान केले. पंढरपूर रक्तपेढी,पंढरपूर यांनी रक्तसंकलन केले. रक्तदान शिबिरामध्ये तोंडाला मास्क व रुमाल तसेच सुरक्षित अंतर ठेवणे इत्यादी नियमांचे पालन करण्यात आले. रक्तदान शिबिर यशस्वी करण्यासाठी उमरड ग्रामस्थ,सरपंच,उपसरपंच, ग्रा.सद्स्य ,पोलीस पाटील,पंचकृषितील ग्रामस्थ व श्री शिवशंभू चॅरिटेबल ट्रस्ट यांनी परिश्रम घेतले. तसेच प्रत्येक रक्तदात्यास श्री शिवशंभू चॅरिटेबल ट्रस्ट यांचेकडून हेल्मेट भेट म्हणून देण्यात आले.
तसेच श्री शिव शंभू चॅरिटेबल ट्रस्टचे करमाळा तालुका अध्यक्ष श्री संजय सरडे व शहराध्यक्ष मा.उमेश सूर्यवंशी, कार्याध्यक्ष मा.सुनिल जगदाळे,संपर्कप्रमुख मा.नितीन गोफणे, ता.उपाध्यक्ष मा.अंगद भांडवलकर यांनी भेट दिली.
तसेच रक्तदात्यांना व गोर गरीब गरजूना श्री शिवशंभू चॅरिटेबल ट्रस्ट तर्फे मोफत बॅग देण्यात येईल असे ट्रस्ट चे अध्यक्ष भूषण सुर्वे यांनी सांगितले.
"शिबिराचे आयोजन  उमरड ग्रामस्थ यांनी केले होते".

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने

Comments


 

sponsor