दि.04/07/2020 (प्रतिनिधी-विशाल गोफणे)
शिवश्री भूषण सुर्वे ( अध्यक्ष श्री शिव शंभू चॅरिटेबल ट्रस्ट महाराष्ट्र( यांच्या मार्गदर्शनाखाली डॉक्टर्स दिनानिमित्त श्री शिवशंभू चॅरिटेबल ट्रस्टचे बीड जिल्हा अध्यक्ष शिवश्री नितीन पवार यांनी रक्तदान केले होते. आज पाटोदा येथील अहमद शेख यांना अर्जंट O-ve रक्ताची गरज होती. ते बीड ला ऍडमिट आहेत.
त्यांचे नातेवाईक नविद सय्यद यांचा नितीन पवार यांना कॉल आला. व अवघ्या 10 मिनिटात दादांनी रक्तदान केलेली O-ve रक्ताची बॅग अहमद शेख यांना मोफत देऊन त्यांचा जीव वाचविला.
दादा तुमच्यामुळे आज एक जीव वाचला आपल्या ट्रस्ट मधील कामाला सलाम.
चला रक्तदान मोहीम राबवुया,
रक्तदान करून जिव वाचवुया..!
उपाध्यक्ष
(बीड जिल्हा कमिटी)
श्री शिवशंभू चॅरिटेबल ट्रस्ट, महाराष्ट्र राज्य
टिप्पणी पोस्ट करा