ता: पंढरपूर( तिसंगी )(प्रतिनिधी-विशाल गोफणे)
आज दिनांक 5 जुलै 2020 रोजी गुरुपौर्णिमा श्री. गजेंद्र शेळके राहणार -तिसंगी( शेळके मळा )यांच्या घरामध्ये अचानक त्यांची पत्नी घरात अडगळीच्या ठिकाणचे खुरपण्यासाठी खुरपे काढत असताना, भल्यामोठ्या नागाला स्पर्श झाला. नागाने फणा काढला. नशिबानं दंश केला नाही.त्या पूर्णपणे घाबरलेल्या अवस्थेत शेतात काम करणार्या आपल्या मुलांना आरडाओरडा करून बोलावले. व नंतर या वेळेतच विजय बोरकर तसेच विजय मधुकर शेळके यांनी पत्रकार अशोक पवार सर यांना फोन केला व त्या ठिकाणी अशोक पवार सर सर्पमित्र नसतानासुद्धा पाच मिनिटातच हजर झाले आणि मित्र कंपनीच्या साह्याने प्रवीण बोरकर ,विक्रम बाजीराव शेळके यांच्या मदतीने हा भला मोठा नाग पकडला. एका पाणी भरण्याच्या कळशीमध्ये घालून तो नजीकच्या फॉरेस्ट खात्यात नेऊन सोडला .त्यावेळी या घरातील लोकांनी सुटकेचा श्वास सोडला .खास करून या लोकांचे प्राण वाचवण्याचे धाडस अशोक पवार सरांनी केले.
टिप्पणी पोस्ट करा