LIVE TV


®️ केंद्र सरकारने वाहनांच्या नोंदणीसाठी 'भारत सिरीज' किंवा 'बीएच' (BH) सिरीज जारी केलीय. त्यामुळे आता तुम्ही नोकरी-धंद्यानिमित्त राज्य बदलले, तरी पुन्हा एकदा वाहनाची नोंदणी करावी लागणार नाही.

🚘 कामानिमित्त अनेकांना परराज्यात जावे लागते. त्या राज्यात गेल्यावर एक वर्षांच्या आत पुन्हा एकदा आपल्या वाहनाची नोंदणी करावी लागते. त्यासाठीचा खर्च व जून्या आरटीओची एनओसी लागते. त्यामुळे अनेक जण नव्या ठिकाणी वाहनांची नोंदणी करीत नव्हते.

🎫 केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालयाने काल (शुक्रवारी) 'भारत सीरिज'ची अधिसूचना जारी केली. त्यानुसार, आता 'बीएच' सीरीजची वाहने देशभरात वैध असतील. राज्य बदलले, तरी वाहनाची पुन्हा नोंदणी करावी लागणार नाही.

👮🏻‍♀️ संरक्षण कर्मचारी, केंद्र-राज्य सरकारी कर्मचाऱ्यांना ही सुविधा स्वैच्छिक असेल. तसेच चार वा त्यापेक्षा अधिक राज्यांत कार्यालये असणाऱ्या खासगी कंपन्यांचे कर्मचारीही या सुविधेचा लाभ घेऊ शकतील.

⁉️ _*आता कसा असेल नंबर?*_
आता वाहनांची YY BH 4144 XX YY या स्वरुपात नोंदणी होणार आहे. YY म्हणजे पहिले रजिस्ट्रेशन वर्ष, BH- भारत सीरीज, कोड 4-0000 ते 9999, XX- मधली अक्षरे AA to ZZ. उदा. गाडीचा नंबर 21 BH 1234 MH असा असू शकतो.
➖➖➖➖➖➖➖➖➖➖
🎯Sk News Pandharpur
➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖
📣 _*जाहिरातीसाठी संपर्क - 9503300919*_

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने

Comments


 

sponsor