LIVE TV

अकलूज ( ता. माळशिरस ) नेवरे येथे कृषिकन्या कोमल जाधव कडून लिंबोळी अर्क बनवण्याचे प्रात्यक्षिक.
 राहुरी कृषी विद्यापीठांतर्गत श्रीराम कृषी महाविद्याeलय पाणी व अंतर्गत नेवरे (तालुका माळशिरस )येथे ग्रामीण कृषि कार्य कार्यानुभव कार्यक्रम या उपक्रमाद्वारे निंबोळी अर्क तयार करण्याचे प्रात्यक्षिक घेण्यात आले.कृषिकन्या कोमल जाधव या विद्यार्थिनीने निंबोळी अर्क कसा तयार करावा, यावर शेतकऱ्यांना मार्गदर्शन केलेले आहे.निंबोळी अर्क म्हणजे कडुलिंबाच्या बिया पासून तयार केलेले अर्क .कडू लिंब हे औषधी वनस्पती आहे. यात असलेले अझाडिरेक्टिन कीटकनाशक म्हणून काम करते.या अर्काचा उपयोग मावा, तुडतुडे,खोड कीडे यावर  अत्यंत चांगला परिणाम होतो.  हे एक नैसर्गिक कीटकनाशक असून याने रासायनिक कीटकनाशका  सारखी बाधा होत नाही. त्यामुळे शेतकऱ्यांनी फवारणीचा उपयोग करावा. असे कृषिकन्या कोमल जाधव हिने सांगितले आहे. श्रीराम कृषी महाविद्यालयाचे प्राचार्य एच बी हाके प्राध्यापक के यु देशमुख, प्राध्यापक डी. स. शिंदे 
 यांचे प्रमुख यांनी योग्य मार्गदर्शन मिळाले आहे.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने

Comments


 

sponsor