LIVE TV

अकलूज ( ता. माळशिरस ) नेवरे 
कृषीकन्या अपेक्षा कांबळे कडून साठवलेल्या धान्य किडीचे व्यवस्थापन यावर प्रात्यक्षिक....
     राहुरी कृषी विद्यापीठ अंतर्गत श्रीराम कृषी महाविद्यालय, पानीव अंतर्गत नेवरे येथे ग्रामीण कृषी कार्यानुभव कार्यक्रम या उपक्रमाव्दारे साठवलेल्या धान्य किडीचे व्यवस्थापन यावर प्रात्यक्षिक घेण्यात आले. कृषी कन्या अपेक्षा कांबळे यांनी साठवलेल्या धान्य किडीचे व्यवस्थापन कसे करावे , या विषयी शेतकऱ्यांना मार्गदर्शन केले. साठवलेल्या धान्य किडीचे सोप्या व घरगुती पद्धतीने कसे व्यवस्थापन करावे याविषयी शेतकऱ्यांना माहिती दिली गेली. बोरिक पावडर व कडुनिंबाची पानांचा उपयोग करून कसा पद्धतीने साठवलेल्या धान्य किडीचे व्यवस्थापन करावे याचे प्रातेक्षिक अपेक्षा कांबळे यांनी करून दाखवले. कडुनिंब हे एक औषधी वनस्पती आहे. यात अझाडिरिक्टिन हा घटक कीटकनाशक म्हणून काम करतो. कडुनिंबाची पानांमुळे धान्याचे जास्त कालावधीसाठी किडा पासून संरक्षण होते, असे कृषी कन्या अपेक्षा कांबळे यांनी सांगितले. तरी श्रीराम कृषी महाविद्यालयाचे प्राचार्य मा. एच. बी. हाके सर, कार्यक्रम अधिकारी जे. आय. शेख मॅडम, तसेच प्राध्यापक डी. एस. शिंदे सर यांनी कृषी कन्या अपेक्षा कांबळे याना मोलाचे मार्गदर्शन केले.

1 टिप्पण्या

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने

Comments


 

sponsor